साइड-टू-साइड सीट अप मारण्याचा विश्वविक्रम

खुश सुनील भानुशाली हा एस.एम.शेट्टी हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्याने प्रशिक्षक श्री सुनील लेंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली १ मिनिटात १०० साइड टू साइड सीट अप यशस्वीरित्या पार करून त्याने विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तो वयोगट बारा वर्षाखालील मार्शल आर्ट्स खेळाडू असून घाटकोपर पश्चिम, मुंबई येथील आहे. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया चे वरिष्ठ प्रतिनिधी […]

साइड-टू-साइड सीट अप मारण्याचा विश्वविक्रम

खुश सुनील भानुशाली हा एस.एम.शेट्टी हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्याने प्रशिक्षक श्री सुनील लेंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली १ मिनिटात १०० साइड टू साइड सीट अप यशस्वीरित्या पार करून त्याने विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तो वयोगट बारा वर्षाखालील मार्शल आर्ट्स खेळाडू असून घाटकोपर पश्चिम, मुंबई येथील आहे. वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया चे वरिष्ठ प्रतिनिधी सुषमा नार्वेकर आणि संजय नार्वेकर यांच्याकडून मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

जगभरातील विविध क्षेत्रातील अनोखी कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला व्यासपीठ देण्याचे काम सुषमा नार्वेकर आणि संजय नार्वेकर अविरतपणे करीत असतात. मोबाईलचा अतिरिक्त वापर आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या या पिढीला हा एक प्रकारे संदेशच आहे की आपला अमूल्य वेळ इतरत्र खर्च न करता आपल्या अंगी असलेले कौशल्य जोपासण्याचा प्रयत्न करावा आणि त्यातून एक स्वतःची ओळख निर्माण करावी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number