बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात उल्कापाताच्या आघातातून ५२ हजार वर्षांपूर्वी हे खाऱ्या पाण्याचं सरोवर निर्माण झाले आहे. पर्यटक, अभ्यासक तसेच वैज्ञानिकांसाठी लोणार सरोवर आज खुली प्रयोगशाळा आहे.चंद्रयान मोहीम असेल मंगळ मोहीम असेल अशा अंतराळातील मोहिमेसाठी लोणारचा अभ्यास अनेक वैज्ञानिकांनी कडून केला गेला आहे. शिवाय पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही लोणारला अनन्यसाधारण महत्त्व आहे.लोणार सरोवराचा जर विकास झाला तर बुलढाणा जिल्ह्याला एक मोठी रोजगाराची पर्वणी मिळेल यात शंका नाही शिवाय पर्यटनातून विदेशी डॉलर्स ही मिळतील. मात्र या सर्व बाबींकडे महाराष्ट्राचं पर्यटन विभाग असेल किंवा केंद्राचा पुरातत्व खातं हे सर्व साफ दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत. लोणार सरोवराच्या विकासासाठी अनेकदा लोणार विकास आराखडा तयार झाला कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे .मात्र अद्याप या लोणारच्या विकासावर निधी खर्च झालेला नाही. त्यामुळे लोणार सरोवर विकासापासून वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे.
५२ हजार वर्षांपूर्वी उल्कापाताच्या आघाताने बुलढाणा जिल्ह्यात तयार झालेले जगातील एकमेव बेसाल्ट खडकापासून तयार झालेले हे लोणार सरोवर आहे, उल्कापाताने तयार झाल्यामुळे त्याची जगभरात किर्ती आहे . मात्र जगप्रसिद्ध असलेल्या या लोणार सरोवराकडे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. लोणार सरोवराचा विकास बैठकांमध्ये अडकून पडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे एक वरदानच म्हणावे लागेल, या ठिकाणी संशोधक, अभ्यासक, पर्यटक मोठ्या संख्येत दरवर्षी भेटी देत असतात. मात्र येथे उपलब्ध असलेल्या सुविधे अभावी हा टक्का अत्यंत कमी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी स्थानिक लोणार प्रेमी कडून केली जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा पुराण, स्कन्धपुराण, पद्मपुराण या सारख्या प्राचीन ग्रंथातही उल्लेख आढळतो.अशा विविधतेने नटलेल्या लोणार कडे लक्ष देण्याची नितांत गरज आहेलोणारच्या विकासाकडे सरकार असेल किंवा प्रशासन असेल ते फारसे लक्ष देताना पाहायला मिळत नाही. बैठकांवर बैठका होतात मात्र कृतीशून्यता नेहमीच पाहायला मिळाल्याची खंत येथील नागरिकांकडून बोलली जाते आहे. लोणार सारखे सरोवर जर एखाद्या विकसित राष्ट्रांत असते तर पर्यटनाच्या माध्यमातून या देशाने मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन कमावत स्वतःचा विकास साधला असता.शिवाय देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत केली असती.