चेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच…

अनेकदा मस्करीमध्ये केलेली गोष्ट कशी जीवघेणी ठरू शकते, याचं जीवघेणं उदाहरण कोल्हापूरच्या फॉण्ड्री गावातील कारखान्यात दिसलं. एका कामगाराने मस्करीमध्ये दुसऱ्या कामगाराच्या गुद्द्वारात पंपाची हवा सोडली. मात्र या हवेने कामगाराचं पोट फुगून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. कोल्हापूरच्या फॉण्ड्री गावामधील एका कारखान्यात 3 सप्टेंबर रोजी ही दुर्दैवी […]

चेष्टेने गुद्द्वारात सोडली हवा, पण घडलं काही वेगळंच…

अनेकदा मस्करीमध्ये केलेली गोष्ट कशी जीवघेणी ठरू शकते, याचं जीवघेणं उदाहरण कोल्हापूरच्या फॉण्ड्री गावातील कारखान्यात दिसलं. एका कामगाराने मस्करीमध्ये दुसऱ्या कामगाराच्या गुद्द्वारात पंपाची हवा सोडली. मात्र या हवेने कामगाराचं पोट फुगून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

कोल्हापूरच्या फॉण्ड्री गावामधील एका कारखान्यात 3 सप्टेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली. कारखान्यामध्ये काम करताना धातूचे कण अंगावर चिकटतात. ते काढण्यासाठी पंपाद्वारे अंगावर हवा सोडली जाते. या हवेचा दाब प्रचंड असतो. या पंपाने अंगावर हवा सोडण्यासाठी सुपरवायजरचीही नियुक्ती केली असते.

 

3 सप्टेंबर रोजी आदित्य जाधव नामक कामगार याच्या अंगावर सुपरवायजरने हवा मारण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी गंमत म्हणून सुपरवायजरने आदित्य जाधव याच्या गुद्द्वारातही हवा सोडली. मात्र यामुळे आदित्य जाधव जागच्या जागीच कोसळला. त्याच्या पोटात हवा जाऊन त्याचे पोट फुगले होते. त्याला आधी इचलकरंजी येथील खासगी दवाखान्यात आणि नंतर कोल्हापूरला उपचारांसाठी नेण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

या घटनेनंतर सुपरवायजर फरार झाला आहे. प्रकृतीची कोणतीही समस्या नसताना अचानक आदित्यचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना संशय आला. त्यांनी कारखान्याती सीसीटीव्ही फुटेज पाहाण्याची मागणी केली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आदित्यच्या मृत्यूचा धक्कादायक प्रकार उघड झाला. शाहुपुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number