‘महिला कुस्तीपटूंना सरकारी नोकरीत प्राधान्य नाही’

कुस्तीमध्ये पुरुषांप्रमाणेच महिला कुस्तीपटू मेहनत घेतात. मात्र पुरुष कुस्तीपटूंना सरकारी नोकरीमध्ये लवकर प्राधान्य दिले जाते. तर महिला कुस्तीपटू तुलनेने मागे पडत असल्याची खंत राष्ट्रीय कुस्ती खेळाडू स्वाती शिंदे हिने व्यक्त केली आहे. धुळे शहरात संपन्न झालेल्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावल्यानंतर स्वाती शिंदे यांनी ही खंत व्यक्त केली. दहा वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धेत तिने […]

‘महिला कुस्तीपटूंना सरकारी नोकरीत प्राधान्य नाही’

कुस्तीमध्ये पुरुषांप्रमाणेच महिला कुस्तीपटू मेहनत घेतात. मात्र पुरुष कुस्तीपटूंना सरकारी नोकरीमध्ये लवकर प्राधान्य दिले जाते. तर महिला कुस्तीपटू तुलनेने मागे पडत असल्याची खंत राष्ट्रीय कुस्ती खेळाडू स्वाती शिंदे हिने व्यक्त केली आहे. धुळे शहरात संपन्न झालेल्या खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावल्यानंतर स्वाती शिंदे यांनी ही खंत व्यक्त केली. दहा वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्ण पदक पटकावले असून, चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील ती खेळलेली आहे. असे असूनही नोकरीपासून ती वंचित आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मुली कुस्ती स्पर्धेत भाग घेतात आणि तशा पद्धतीचा सराव देखील करतात.

आता कुस्ती क्षेत्रात मुलींची संख्या वाढली असून, मुली चांगल्याप्रकारे यश मिळवत आहेत. त्यामानाने सरकार मात्र मुलींना न्याय देत नसल्याची खंत तिने यावेळी व्यक्त केली. एकीकडे राज्यातील स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ झाल्यानंतर डीवायएसपी पदापर्यंत पुरुषांना तात्काळ नोकरी दिली जाते. ही गौरवाची बाब असली तरी दुसरीकडे मात्र त्याच पद्धतीने कुस्ती खेळणाऱ्या मुलींना न्याय मिळत नाही. त्यामुळे सरकारने काढलेला जुना अध्यादेश बदलून त्यात सुधारणा करावी आणि मुलींना नोकरीत संधी द्यावी, जेणेकरून कुस्ती क्षेत्राकडे मुलींचा कल वाढेल आणि जास्त जास्त मुली कुस्ती खेळतील अशी मागणी यावेळी तिने केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number