छत्रपती संभाजीनगर : अवघ्या काही दिवसांवर मकरसंक्रांतीचा सण आला आहे. या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे एका दुकानदाराने साड्यांवर मोठी ऑफर जाहीर केली. तब्बल 5000 रुपयांची साडी 599 रुपयांत मिळणार असल्याची जाहिरीत सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. हे समजताच हजारोंच्या संख्येंने महिलांनी दुकानाबाहेर गर्दी केली. इतक्या स्वस्तात साडी मिळणार असल्याने महिलांची दुकानात शिरण्यासाठी एकच झुंबड उडाली. परिणामी, या ठिकाणी महिलांची चेंगराचेंगरी झाली. त्यातच तीन महिलादेखील बुशद्ध पडल्या. या गर्दीला कारणीभूत असलेल्या दुकानदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून येथील महिलांची गर्दी पांगवण्यात आली आहे.