‘स्त्रियांनी मोठ्या संख्येनं राजकारणात यायला हवं’

संपूर्ण जगभर ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जगभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे मनसेचं ध्येय असून त्यामध्ये महिलांचा सहभाग आणि भूमिका देखील तितीकच महत्त्वाची आहे, असे म्हणत राज […]

‘स्त्रियांनी मोठ्या संख्येनं राजकारणात यायला हवं’

संपूर्ण जगभर ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जगभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे मनसेचं ध्येय असून त्यामध्ये महिलांचा सहभाग आणि भूमिका देखील तितीकच महत्त्वाची आहे, असे म्हणत राज ठाकरेंनी पात्राच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तसेच स्त्रियांनी मोठ्या संख्येने राजकारणात यायला हवं, असे आवाहनही त्यांनी केले.

राज ठाकरे यांचे महिलादिनानिमित्त लिहिलेले पत्र

सगळ्या चौकटी मोडून, आज सर्वच क्षेत्रामंध्ये स्त्रियांची जी घौडदौड सुरु आहे ती थक्क करणारी आहे. आज ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील, इथल्या मुलींना उच्च शिक्षणाची , स्वतःच करिअर घडवायची प्रचंड ओढ आहे. आणि त्यासाठी त्या घरापासून लांब, इतर शहरांत किंवा परदेशांत नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने सहज स्थिरावत आहेत, आणि जिथे जातील तिथे स्वतःचा ठसा उमटवत आहेत. हे चित्र आनंददायी आहे.

१००,१५० वर्षांपूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळावा म्हणून प्रचंड संघर्ष करावा लागत होता अशी परिस्थिती होती. आणि त्याच समाजात मोठमोठ्या उद्योगसमूहांच्या व्यवस्थापनापासून ते जागतिक अर्थकारणात उलाढाली करणाऱ्या संस्थांमध्ये मोठ्या पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत. इतकंच काय देशाची अर्थव्यवस्था, परराष्ट्र व्यवहार, सीमांचं संरक्षण ते थेट राष्ट्रपतीपदी स्त्रिया आपला ठसा उमटवत आहेत. आणि हे सर्व त्यांनी निव्वळ स्वकर्तृत्वावर कमावलं आहे.

म्हणूनच आता स्त्रियांनी आता राजकारणात देखील मोठ्या प्रमाणावर यायला हवं. ‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं’ हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय आहे, आणि हे साध्य करायचं असेल तर स्त्रियांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे, ह्याची आम्हाला जाणीव आहे. म्हणूनच विविध क्षेत्रांत स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number