कठोर दारूबंदीसाठी महिलांनी गाठला हा मार्ग

वडगाव जंगली येथील महिलांनी गावातील दारू हद्दपार करावी या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. गावात कठोर दारूबंदी करावी अशी मागणी लावून धरली. संसार या दारूमुळे उद्ध्वस्त होत असल्याची बाब देखील यामुळे समोर आली आहे. जिल्ह्यात दारूबंदी आहे, पण या दारूबंदीला झुगारून दारू विकली जात आहे. या दारूविक्रीला आळा घालणं शक्य होत नसल्याची बाब समोर […]

कठोर दारूबंदीसाठी महिलांनी  गाठला हा मार्ग

वडगाव जंगली येथील महिलांनी गावातील दारू हद्दपार करावी या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलं. गावात कठोर दारूबंदी करावी अशी मागणी लावून धरली. संसार या दारूमुळे उद्ध्वस्त होत असल्याची बाब देखील यामुळे समोर आली आहे.

जिल्ह्यात दारूबंदी आहे, पण या दारूबंदीला झुगारून दारू विकली जात आहे.

या दारूविक्रीला आळा घालणं शक्य होत नसल्याची बाब समोर आली आहे.

वर्धा आणि नागपूर या जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या वडगाव जंगली येथे दारू विक्रेत्यांनी उच्छाद मांडला आहे.

महिलांनी याविररोधात प्रयत्न केले. स्थानिक पोलिसांकडडे तक्रारही केली.

पण प्रश्न सुटला नाही.

त्यामुळे वडगाव जंगली येथील महिलांनी वर्ध्याच्या आमदारांना भेटून आपली व्यथा मांडली. आमदार महिलांसह पोलीस अधिक्षक कार्यालयात पोहचून निवेदन दिलं आहे.

खिश्यात दारू वाहून नेली जाते. पन्नीमधूनही दारू विकली जाते. आमच्या घरची मंडळी दारू विकत घेत पिऊन घरी पोहचत आहे आणि घरी भांडणं होत आहेत. त्यामुळे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.

दारूबंदी करणाऱ्या महिलांना धमकी मिळत आहे. घाण शिवीगाळ देखील केली जात आहे .

दारूबंदी करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अपयशी ठरत आहे, त्यामुळे महिलांचा पुढाकार आता ही दारूविक्री थांबवू शकेल काय ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number