महिला महाराष्ट्र केसरी वादाच्या भोवऱ्यात

5व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा फड आजपासून पुण्यात रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नऊशेहुन अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. एकिकडे ही स्पर्धा सुरू होत असताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या स्पर्धेवर आक्षेप घेत ही स्पर्धा अधिकृत नसल्याचा आरोप केला आहे. मात्र या स्पर्धेला […]

महिला महाराष्ट्र केसरी वादाच्या भोवऱ्यात

5व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा फड आजपासून पुण्यात रंगणार आहे. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत नऊशेहुन अधिक पैलवान सहभागी होणार आहेत. एकिकडे ही स्पर्धा सुरू होत असताना महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांनी या स्पर्धेवर आक्षेप घेत ही स्पर्धा अधिकृत नसल्याचा आरोप केला आहे. मात्र या स्पर्धेला भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता असल्यानं ही स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वीच पैलवानांच्या डोपिंगचा मुद्दा चर्चेत आला होता. अशातच आजपासून मानाच्या अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला आजपासून पुण्यात सुरुवात होणार आहे. 10 ते 14 जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यंदा मानाच्या गदेवर कोण नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेती प्रतीक्षा बागडी ही आपली सांगलीतील महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा बाजूला ठेवून पुन्हा कोल्हापूरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होत आहे. यामुळे खरी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणती? यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

खरतर कुस्तीगीर परिषद व कुस्ती महासंघामध्ये महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठीची लढाई फेब्रुवारीपासून रंगली होती. पुणे, सांगली आणि कोल्हापूर येथे स्पर्धेची घोषणा संयोजकांनी केली होती. अखेर पुण्यातील स्पर्धा रद्द करून कोल्हापुरात निश्चित झाली. दरम्यान, कुस्तीगीर परिषदेने सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी आयोजन केले. तर या स्पर्धेला महाराष्ट्रातून महिला कुस्तीगिरांनी हजेरी लावली. त्यामध्ये सांगलीच्या प्रतीक्षा बागडीने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला चितपट करत केसरी किताब जिंकला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number