केवळ धक्का लागल्याने रेल्वेसमोर दिले ढकलून, पुरुष प्रवाशाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई रेल्वे फलाटावर धक्का लागल्याने पुरुष प्रवाशाला महिला प्रवाशाने चक्क धावत्या लोकलसमोर ढकलून दिलंय. मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकावर ही धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मागून आलेल्या पुरुषाचा धक्का लागल्याने महिला त्या व्यक्तीस धक्का देते, यामध्ये तो पुरुष सरळ स्थानकाच्या ट्रॅकवर जाऊन पडतो, तोच समोरुन […]

केवळ धक्का लागल्याने रेल्वेसमोर दिले ढकलून, पुरुष प्रवाशाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रेल्वे फलाटावर धक्का लागल्याने पुरुष प्रवाशाला महिला प्रवाशाने चक्क धावत्या लोकलसमोर ढकलून दिलंय. मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकावर ही धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार स्थानकातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मागून आलेल्या पुरुषाचा धक्का लागल्याने महिला त्या व्यक्तीस धक्का देते, यामध्ये तो पुरुष सरळ स्थानकाच्या ट्रॅकवर जाऊन पडतो, तोच समोरुन लोकल येते.

दीपक पटवा असं या प्रवाशाचं नाव असून, या घटनेत त्याचा मृत्यू झालाय. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number