वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आई आपल्या बाळासाठी काहीही करु शकते असे म्हटले जाते. पण, उत्तर प्रदेशमध्ये घडलेला हा प्रकार तुम्हाला हादरवून टाकेल. उत्तर प्रदेशच्या एका आईवर येऊ नये अशी वेळ आलीय. पतिव्रतेचे कर्तव्य निभावताना आपल्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला विकण्याची दुर्दैवी वेळ महिलेवर आली.
कामगार असलेल्या तिच्या पतिचा काम करत असताना अपघात झाला. आणि या अपघातामध्ये उपचारादरम्यान त्याचं हाड मोडले. परंतु त्याच्या उपचारासाठी या महिलेकडे पैशांची वानवा निर्माण झाली. म्हणूनच या महिलेने आपल्या 15 दिवसांच्या बाळाला विकण्याचे पाऊल उचलले.