अंबाजोगाईत वकील महिलेला डीजेच्या तक्रारीवरून सरपंचाकडून बेदम मारहाण

घरासमोरच्या डीजे आवाजाविरोधात तक्रार केल्यानंतर एका महिला वकिलावर प्रचंड अमानुष मारहाण करण्यात आली आहे.

अंबाजोगाईत वकील महिलेला डीजेच्या तक्रारीवरून सरपंचाकडून बेदम मारहाण

बीड: बीड जिल्हा पुन्हा एकदा गंभीर गुन्हेगारीच्या बातम्यांमुळे चर्चेत आला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, घरासमोरच्या डीजे आवाजाविरोधात तक्रार केल्यानंतर एका महिला वकिलावर प्रचंड अमानुष मारहाण करण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषणामुळे त्रस्त झालेल्या या महिलेला गावातील सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन काठ्या व रबरी पाईपने बेदम मारले. या हल्ल्यामुळे तिच्या अंगावर गंभीर जखमा होऊन अंग काळं-निळं पडलं आहे. 

या प्रकाराची दखल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स (ट्विटर) वर दिलेल्या पोस्टद्वारे घेतली. त्यांनी संबंधित घटनेचे फोटो शेअर करत महिलेला झालेल्या अत्याचाराची माहिती जनतेसमोर आणली. पीडित वकील  महिलेने यापूर्वी डीजे, गिरणी आणि इतर ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीत तक्रारी केल्या होत्या, कारण यामुळे तिला मायग्रेनचा त्रास होत होता. मात्र, या तक्रारीचा परिणाम म्हणून तिला शेतात नेऊन बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्यात आली. उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: अंगणात खेळत असताना चॉकलेटचे आमिष दाखवून 5 वर्षाच्या चिमुकलीवर घरमालकाकडून अत्याचार

सरपंच आणि त्याच्या दहा कार्यकर्त्यांनी मिळून एका शिक्षित महिला वकिलावर हल्ला केल्याचा प्रकार अतिशय लाजीरवाणा होता या सरपंचाचा नेमका राजकीय पाठिंबा कोणाचा आहे, याबद्दल समाजात आता प्रश्न उपस्थित होतायत. जितेंद्र आव्हाड यांनीच यासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया नोंदवून या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number