बीडमध्ये वकील महिलेला अमानुष मारहाण; सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

काही महिन्यांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या कृत्यामुळे चर्चेत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. वकील महिलेला सरपंचाकडून मारहाण करण्यात आली आहे.

बीडमध्ये वकील महिलेला अमानुष मारहाण; सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

बीड : काही महिन्यांपासून बीड जिल्हा गुन्हेगारीच्या कृत्यामुळे चर्चेत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना घडली आहे. वकील महिलेला सरपंचाकडून मारहाण करण्यात आली आहे. घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीमुळे वकील महिलेला मारहाण करण्यात आली आहे. बीडमधील अंबेजोगाई तालुक्यात ही घटना घडली आहे.  

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला सरपंच व इतर दहा जणांनी 14 एप्रिल रोजी लाकडी काठी व रबरी पाईपने मारहाण केली. या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. दरम्यान अतिशय अमानुषपणे ही मारहाण करण्यात आली असून याचे छायाचित्र व्हायरल होताच राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून सरपंचासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी पुढे येत असून वडगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : तरुणीला त्रिकुटाची धक्काबुक्की; जाब विचारणाऱ्या तरुणाला जबर मारहाण

सरपंचाकडून महिलेला मारहाण केल्याचा प्रकार आव्हाडांनी केला उघड 
पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर हा प्रकार सगळ्यांसमोर आला. अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण करण्यात आली. महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत. घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या अशी पोस्ट आव्हाड यांनी केली आहे. महिलेला गंभीर मारहाण केल्याने महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातून ही एका रात्रीत ऊपचार करून घरी पाठवलं आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल? कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे? असा सवाल यावेळी आमदार आव्हाड यांनी केला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number