धारावीत लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

मुंबईच्या धारावीत आग लागल्याची घटना घडली आहे. धारावीतील अशोक मील कंपाऊंड येथे आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ११:५४ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीच्या घटनेच एका महिलेचा मृत्यू झाला आहे. नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी […]

धारावीत लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

मुंबईच्या धारावीत आग लागल्याची घटना घडली आहे. धारावीतील अशोक मील कंपाऊंड येथे आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ११:५४ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीच्या घटनेच एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. रावीत लागलेल्या आगीतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या दुर्घटनेत ६२ वर्षीय उषा लोंढे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या मृत्युमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या ठिकाणी कपड्यावर लेझरने नक्षीकाम केले जाते. कदाचित लेझरमधून बाहेर पडणाऱ्या आगीच्या ठिणगीमुळेच आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईतील दादर येथील गजबजलेल्या सेनाभवनाजवळील खासगी कॅबला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कॅब जळून खाक झाली आहे. कॅबला आग लागल्यानंतर रस्त्यावरची वाहतूक थांबली होती. या घटनेनंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. कारकॅबचा चालक अरमान अहमद यांनी आगीच्या घटनेबद्दल सांगितलं की, मी उबर चालक आहे. दादरहून विरारला जात असताना वाहनातून अचानक धूर येऊ लागला. प्रशाशांना उतरवून कार चालकाने पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आणखी भडकली. आगाीनंतर परिसरात लोकांची एकच गर्दी झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number