जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
स्त्री म्हटले की आपल्या तोंडात नेहमी एकच वाक्य येते ते म्हणजे मूल आणि चूल हीच स्त्रीची जबाबदारी, त्यापलीकडे स्त्रीने जाऊ नये. पण, नाशिकची क्रिकेटपटू माया सोनावणेने आपल्या दमदार खेळीने महिला टी-20 क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे.
बीसीसीआयच्या सिनिअर महिला टी – 20 क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघात नाशिकची अष्टपैलू खेळाडू माया सोनवणे हिची निवड झाली आहे. मुंबईमध्ये 13 ते 16 जानेवारी दरम्यान ही टुर्नामेंट असणार आहे. माया ने औरंगाबादमध्ये झालेल्या 19 वर्षाखालील महिला स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते.