जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मुंबईत प्रथमच अंतर राज्य महिला क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथे 6 मार्च ते 8 मार्च दरम्यान हे क्रिकेट सामने रंगणार आहेत.
महाराष्ट्र,मध्यप्रदेश,चंदीगड,वेस्ट बंगाल,उत्तर प्रदेश,उत्तराखंड,या राज्यातील महिला टीम या लीगमध्ये उतरणार आहेत.

राज्यातील अनेक महिला क्रिकेट स्पर्धक पुढे येत आहेत. वुमन प्रीमियर लीगच्या रूपाने महिलांना खेळ दाखविण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाला आमदार पराग अळवणी, ज्योती अळवणी यांच्यासह अभिनेत्री पल्लवी जोशी देखील उपस्थित होत्या.