वृत्तसंस्था, फरीदाबाद फरीदाबादमध्ये चालत्या गाडीत एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. तरुणी शनिवारी सायंकाळी ऑफिसमधून घरी परतत असताना स्कॉर्पियो गाडीतून आलेल्या 3 युवकांनी तिचे अपहरण केले. बलात्कारानंतर हे नराधम युवतीला हायवेवरच सोडून फरार झाले. प्रत्यक्षदर्शींनी घटनेबाबत पोलिसांना सूचना दिली. पोलीस लोकेशनच्या सहाय्याने त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. मात्र, तोपर्यंत नराधम युवतीला हायवेवर सोडून पसार […]
फरीदाबादमध्ये चालत्या गाडीत एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडलीय. तरुणी शनिवारी सायंकाळी ऑफिसमधून घरी परतत असताना स्कॉर्पियो गाडीतून आलेल्या 3 युवकांनी तिचे अपहरण केले.
बलात्कारानंतर हे नराधम युवतीला हायवेवरच सोडून फरार झाले. प्रत्यक्षदर्शींनी घटनेबाबत पोलिसांना सूचना दिली. पोलीस लोकेशनच्या सहाय्याने त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते.
मात्र, तोपर्यंत नराधम युवतीला हायवेवर सोडून पसार झाले. विशेष तपास पथकाची स्थापना करत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.