India-US Trade Deal : ट्रम्प भारतावरील टॅरिफ कमी करून 20 टक्के करतील? ‘या’ ब्रोकरेज कंपनीने केली भविष्यवाणी

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या वाटाघाटींचे 6 टप्पे पूर्ण झाले असून, हा करार झाल्यानंतर ट्रम्प त्यांनी भारतावर लावलेला टॅरिफ घटवतील का, असा प्रश्न विचारला जात आहे.

India-US Trade Deal : ट्रम्प भारतावरील टॅरिफ कमी करून 20 टक्के करतील? ‘या’ ब्रोकरेज कंपनीने केली भविष्यवाणी

India-US Trade Deal : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराच्या (Indo-US Trade Deal) वाटाघाटींचे 6 टप्पे पूर्ण झाले असून, हा करार आता अंतिम टप्प्यात पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच दरम्यान, जपानची दिग्गज ब्रोकिंग फर्म नोमुराने (Nomura) एक महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. नोमुराच्या मते, अमेरिका-भारत व्यापार कराराच्या (US-India Trade Deal) अंतिम निष्कर्षाबद्दल अद्याप अनिश्चितता असली तरी, दोन्ही देशांकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत.

टॅरिफ 20 टक्क्यांवर येण्याची शक्यता
ब्रोकरेज नोमुराला विश्वास आहे की या करारावर लवकरच स्वाक्षरी होईल आणि त्यानंतर टॅरिफ (Tariff) म्हणजेच आयात शुल्क 50 टक्क्यांवरून कमी होऊन 20 टक्क्यांच्या आसपास येईल. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये भारतावरील टॅरिफ दुपटीने वाढवून 50 टक्के केला होता. यापैकी 25 टक्के टॅरिफ हा रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल दंडाच्या (Penalty) रूपात लावला गेला आहे.

हेही वाचा – Freebies Policy : मोफत योजना ही राजकीय अपयशाची कबुली, मतांसाठी देशाची तिजोरी रिकामी; माजी गव्हर्नर सुब्बाराव यांनी सुनावलं

जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला
नोमुराने भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दलही (Economy) सकारात्मक मत व्यक्त केले आहे. सप्टेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी ग्रोथ रेट (GDP Growth Rate) 8.2 टक्के राहिला, जो जून तिमाहीतील 7.8 टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी सुधारली आहे. नोमुराने FY26 (आर्थिक वर्ष 2026) साठीचा जीडीपी वाढीचा अंदाज पूर्वीच्या 7.0 टक्क्यांवरून वाढवून 7.5 टक्के केला आहे.

रेपो रेटमध्ये कपातीची अपेक्षा कायम
यासोबतच, 5 डिसेंबरला होणाऱ्या आरबीआयच्या (RBI) एमपीसी बैठकीपूर्वी नोमुराने रेपो रेट (Repo Rate) कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जीडीपी वाढीचे आकडे मजबूत असूनही, रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंट्सची कपात होण्याची अपेक्षा कायम आहे, असे नोमुराने स्पष्ट केले आहे. 25 आधार अंकांची कपात करण्याच्या आपल्या पूर्वीच्या अंदाजावर आपण ठाम राहू, असे नोमुराचे म्हणणे आहे.

हेही वाचा – Rupee International Trade : भारतीय चलनातच होणार 34 देशांशी थेट व्यवहार; डॉलरवरील अवलंबित्व घटणार, व्यापाराला नवी दिशा

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number