शाहरुखची लेक करणार शेती ?

मुंबई, २३ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान अलीकडे बरीच चर्चेत आली आहे. लवकरच सुहाना जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सुहानासह अभिनेत्री खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान सुहाना आता चर्चेत आहे ते म्हणजे एका वेगळ्या कारणामुळे, […]

शाहरुखची लेक करणार शेती ?

मुंबई, २३ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान अलीकडे बरीच चर्चेत आली आहे. लवकरच सुहाना जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सुहानासह अभिनेत्री खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान सुहाना आता चर्चेत आहे ते म्हणजे एका वेगळ्या कारणामुळे, शाहरुखची लेक सुहाना खानने आता आलिबागमध्ये शेती करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे.

नुकतेच अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर आता सुहाना खान आपली शेतीची आवड जपण्यासाठी सज्ज झाली आहे. सुहानाने आलिबागमधील थळ गावातील जमीन शेती करण्यासाठी विकत घेतली आहे. या जमिनीची किंमत कोट्यवधी रुपये असून या जमिनीच्या कागदपत्रांवर सही करताना तिने स्वत:ला शेतकरी असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आता पुढे सुहाना नक्की काय करणार याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.

सुहाना खानने 1 जून 2023 रोजी दीड एकर जमीन विकत घेतली होती. याच दिवशी जमिनीचा व्यवहार आणि नोंदणीदेखील पार पडली. या जागेची एकूण किंमत 12.91 कोटी रुपये आहे असा अंदाज वर्तवला जात आहे. या दीड एकर जागेत 2218 चौरस फूट बांधकामही करण्यात आले आहे. परंतु याबाबत काही कौलास करण्यात आला नव्हता. दरम्यान आता याबाबत रीतसर माहिती समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number