तूर्तास ईडी कार्यालयात जाणार नाही – शरद पवार

महाराष्ट्र राज्य बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र शरद पवारांची पोलीस आयुक्तांनी भेट घेतल्यानंतर ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे शरद पवारांनी माध्यमांसमोर जाहीर केले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ईडीत जाणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो […]

तूर्तास ईडी कार्यालयात जाणार नाही – शरद पवार

महाराष्ट्र राज्य बॅंक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र शरद पवारांची पोलीस आयुक्तांनी भेट घेतल्यानंतर ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे शरद पवारांनी माध्यमांसमोर जाहीर केले. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ईडीत जाणार नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानतो तर शिवसेनेचेही आभार मानत असल्याचे पवारांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले शरद पवार ?

पोलिसांच्या भेटीनंतर ईडी कार्यालयात जाणार नसल्याचे शरद पवार म्हणाले.

तसेच ईडीकडूनही चौकशीसाठी न येण्याचे पत्र आले होते.

मी त्या बॅंकेच्या संचालकपदी कधीच नव्हतो असेही शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

ईडीच्या कारवाईमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

आता तूर्तास ईडी कार्यालयात जाणार नाही.

पाठिंब्याबद्दल मी शिवसेनेचा आभारी.

ज्यांनी पाठिंबा दिला त्या सर्वांचा मी आभारी असल्याचे शरद पवार म्हणाले.

कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ईडीत न जाण्याचा निर्णय –  शरद पावर.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number