‘न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही’

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि ऑलिम्पियन कुस्तीपटू यांच्यातील वाद पुन्हा तापताना दिसत आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. देशातील नामांकित ऑलिम्पियन कुस्तीपटू रविवारी सोनीपतहून दिल्लीच्या जंतरमंतरवर पोहोचले असून त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलक कुस्तीपटूंनी सांगितले की, महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह […]

‘न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही’

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह आणि ऑलिम्पियन कुस्तीपटू यांच्यातील वाद पुन्हा तापताना दिसत आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. देशातील नामांकित ऑलिम्पियन कुस्तीपटू रविवारी सोनीपतहून दिल्लीच्या जंतरमंतरवर पोहोचले असून त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे.

आंदोलक कुस्तीपटूंनी सांगितले की, महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दिली होती, मात्र अद्याप ती नोंदून घेण्यात आली नाही. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद झाली पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा ब्रिजभूषण शरण सिंह आरोपांचा पुनरुच्चार केला. त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. यासंदर्भात कुस्तीपटूंनी पत्रकार परिषदही घेतली आहे. जोपर्यंत पैलवानांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत जंतरमंतर इथं आंदोलन करणार असल्याचा पवित्रा कुस्तीपटूंनी घेतला आहे

सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, आम्ही कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या तक्रारींची चौकशी करत आहोत आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एफआयआर नोंदवला जाईल. हरियाणा आणि बाहेरील कुस्तीपटूंकडून एकूण 7 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सात कुस्तीपटूंनी मुलींनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. परंतू, त्यांच्या तक्रारी देऊनही एफआयआर नोंदवला जात नसल्याचे कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने अद्याप तक्रार दाखल केली नसून, याबाबत जाणून-बुजून विलंब केला जात असल्याचे मलिक म्हणाल्या. समितीच्या चौकशीत काय निष्पन्न झालं, याबाबत कोणतेही तथ्य मांडण्यात आलं नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number