कपिल शर्मा शो प्रेक्षकांचा घेणार निरोप ?

मुंबई, २३ जून २०२३, प्रतिनिधी : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्माची’ बरीच लोकप्रियता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो आपल्या विनोदांच्या माध्यमांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आला आहे. मात्र या शोविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कपिल शर्मा शोच्या माध्यमातून बॉलीवूड चित्रपटांचे प्रमोशन केले जाते, असे नेहमीच म्हंटले जाते. त्यामुळेच यावर […]

कपिल शर्मा शो प्रेक्षकांचा घेणार निरोप ?

मुंबई, २३ जून २०२३, प्रतिनिधी : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘द कपिल शर्माची’ बरीच लोकप्रियता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा शो आपल्या विनोदांच्या माध्यमांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आला आहे. मात्र या शोविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कपिल शर्मा शोच्या माध्यमातून बॉलीवूड चित्रपटांचे प्रमोशन केले जाते, असे नेहमीच म्हंटले जाते. त्यामुळेच यावर नेटकऱ्यांकडून सतत टीका होत असतात. विशेष म्हणजे ह्या शोमध्ये ज्यावेळी एखाद्या मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्या शो च्या निर्मात्यांकडून तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे यापूर्वी दिसून आले होते. दरम्यान आता कपिलचा शो बंद होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गेल्या वर्षी या शोचा चौथा सीझन सुरु झाला होता. आता तो बंद होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आता या शोचा शेवटचा एपिसोड दोन ते नऊ जुलैच्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे. या भागात अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धूलिपाला त्यांच्या द नाईट मॅनेजरच्या सीक्वेलच्या प्रमोशनसाठी येणार असल्याची माहिती आहे. यावेळी कपिलनं अर्चना पुरनसिंग यांच्यासोबत इंस्टावर एक फोटो शेयर केला आहे. त्यात त्यानं आपल्या शो विषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number