‘पुन्हा पक्ष उभा करणार’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या घडामोडींनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ‘मला पक्षाची चिंता नाही, गेलेल्यांच्या भविष्याची चिंता आहे. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे. पुन्हा पक्ष उभा करणार, असा आत्मविश्वास पवारांनी बोलून दाखवला. https://youtu.be/1r4ANHRRt-A दोन दिवसांपूर्वी […]

‘पुन्हा पक्ष उभा करणार’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली असून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या घडामोडींनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. ‘मला पक्षाची चिंता नाही, गेलेल्यांच्या भविष्याची चिंता आहे. माझा महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे. पुन्हा पक्ष उभा करणार, असा आत्मविश्वास पवारांनी बोलून दाखवला.
https://youtu.be/1r4ANHRRt-A
दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक विधान केलं होतं ते काँग्रेसच्या विरोधात होतं, त्यानंतर राष्ट्रवादीबद्दल होतं. त्यात दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या की राष्ट्रवादी भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला. त्याबरोबर सिंचनातील तक्रारीचा उल्लेख केला. हा उल्लेख त्यांनी केल्यानंतर आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या काही लोकांना शपथ दिली. याचा अर्थ त्यांचे आरोप खरे नव्हते. त्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्यावर आरोप केले होते, त्यांना मुक्त केलं. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे शरद पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number