बोर व्याघ्र प्रकल्प सज्ज; वाईल्ड ॲनिमल काऊंटिंगसाठी तयारी पूर्ण

जागतिक वन दिन विशेष : आज एसओपी कार्यशाळा, मांसभक्षी आणि तृणभक्षी प्राण्यांची नोंदणी

बोर व्याघ्र प्रकल्प सज्ज; वाईल्ड ॲनिमल काऊंटिंगसाठी तयारी पूर्ण

वन्यजीव गणनेसाठी ट्रॅप कॅमेरे आणि एमॲ-स्ट्राईम्प ॲपचा होणार वापर
प्रमोद पाणबुडे प्रतिनिधी वर्धा : वर्धा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 6,310 चौरस किलोमीटर असून, जैवविविधतेने नटलेला सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प हा वन्यजीव संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात यंदाच्या उन्हाळ्यात मांसभक्षी वन्यजीवांची गणना करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मांसभक्षी वन्यजीवांसाठी पुरेसे तृणभक्षी वन्यजीव उपलब्ध आहेत का, याचीही नोंद घेतली जाणार आहे.

?? हे देखील वाचा : मुंबई-नागपूर प्रवास महागला, 1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर टोल 19% वाढणार

याच अनुषंगाने, जागतिक वन दिनाचे औचित्य साधून नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी (NTCA) अंतर्गत एसओपी कार्यशाळेचे आयोजन बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या कार्यशाळेत वन्यजीव गणनेचा फेज-4 कसा राबवावा याबाबत 70 हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

गणनेसाठी ट्रान्झिट लाईन आणि कॅमेरा ट्रॅप पद्धती
वन्यजीवांची गणना करताना कोणती पद्धती वापरावी आणि कोणती कार्यपद्धती अवलंबावी, याची सविस्तर माहिती 4 तासांच्या कार्यशाळेत वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल आणि वनरक्षकांना दिली जाणार आहे. यामध्ये विशेषतः ट्रान्झिट लाईन आणि कॅमेरा ट्रॅपींग पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.

370 ट्रॅप कॅमेऱ्यांचा होणार वापर
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या 13,800 हेक्टर कोअर आणि 67,814.46 हेक्टर बफर क्षेत्रात वाईल्ड ॲनिमल काऊंटिंग फेज-4 राबविला जाणार आहे. यासाठी 370 ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे, ज्याद्वारे वन्यजीवांच्या हालचालींची नोंद केली जाणार आहे.

एम-स्ट्राईम्प मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन
वाईल्ड ॲनिमल काऊंटिंग दरम्यान माहिती संकलनासाठी एम-स्ट्राईम्प मोबाईल ॲप वापरण्यात येणार आहे. हे संकलित डेटा नंतर वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, देहरादून येथील तज्ज्ञांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

?? हे देखील वाचा : बोर व्याघ्र प्रकल्पात वाघ सुरक्षित, पण बिबट्यांची घटती संख्या चिंताजनक

बोर व्याघ्र प्रकल्प देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो, मात्र त्याचे वन्यजीव संवर्धनात महत्त्वाचे योगदान आहे. यंदाची गणना वन्यजीव व्यवस्थापनासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number