प्रवीण तरडेंवर पत्नी नाराज

मुंबई,२६ एप्रिल २०२३,प्रतिनिधी : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखलं जातं. ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देखील दिला. दरम्यान, अभिनेता प्रवीण तरडे यांचा आगामी ‘बलोच’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आतापर्यंत आपण प्रवीण तरडे यांना चित्रपटात रुबाबात […]

प्रवीण तरडेंवर पत्नी नाराज

मुंबई,२६ एप्रिल २०२३,प्रतिनिधी : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखलं जातं. ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद देखील दिला. दरम्यान, अभिनेता प्रवीण तरडे यांचा आगामी ‘बलोच’ सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. आतापर्यंत आपण प्रवीण तरडे यांना चित्रपटात रुबाबात किंवा तलवार चालवताना पाहिलं आहे, पण यामध्ये प्रवीण तरडेंचा वेगळाच लुक समोर आला आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री स्मिता गोंदकरसोबत त्यांनी आस खुळी हे रोमँटिक गाणं केलं आहे.

मात्र, दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांच्या पत्नीने हे गाणं अद्याप पाहिलं नाही असा खुलासा केला आहे. तेव्हा ते म्हणाले, ‘खरं सांगायचं तर रोमँटिक गाणं चित्रित करणं माझ्या स्वभावातच नाही. परंतु मला हे गाणं देण्यात आलं. माझ्या पत्नीने हे गाणं पूर्ण पाहिलं नाही. ती पाहणारच नसल्याचं तिने मला सांगितलंय. ते गाणं खरं तर इतकं सुंदर झालंय सर्वांनी हे गाणं पाहिलं आहे. मात्र, माझ्या पत्नीने हे गाणं पाहिलं नाही. मी तिला समजावलं की हा फक्त सिनेमा आहे पण तरी ती रागावली. सरसेनापती हंबीररावमध्ये तिने माझ्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यात रोमँटिक गाणं का केलं नाही असा प्रश्न तिने मला विचारला.’रोमँटिक गाणं करण्याचा अनुभवावर ते म्हणाले, खरं तर तलवार चालवणं त्याहून सोपं रोमॅंटिक गाणं चित्रित करणं होतं. मी हे गाणं घाबरत घाबरतच हे गाणं चित्रित केलं. तसेच, हा सिनेमा येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number