रंगभूमी कला कशासाठी? मनोरंजनासह उद्बोधनासाठी

ग्रीक रंगकर्मींनी यावर्षीच्या रंगसंदेशाद्वारे निर्माण केलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या प्रा. देवदत्त पाठक यांच्या हटके विषयांवरच्या दोन नाटकांचा प्रयोग जागतिक रंगभूमी दिनानिमित्त नुकताच पार पडला.

रंगभूमी कला कशासाठी? मनोरंजनासह उद्बोधनासाठी

पुणे : या फिडोरस तरजोपोलस या ग्रीक रंगकर्मींनी यावर्षीच्या रंगसंदेशाद्वारे निर्माण केलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या प्रा. देवदत्त पाठक यांच्या हटके विषयांवरच्या दोन नाटकांचा प्रयोग जागतिक रंगभूमी दिनानिमित्त नुकताच पुण्यात पार पडला.

छोटी मुलगी वयात येते म्हणजेच तिची मासिक पाळी सुरू होते, त्यावेळेला आवश्यक असलेले पूरक वातावरण तयार होऊन, नको त्या रूढीतून मुक्त व्हावे या विषयावर नाटकाच्या माध्यमातून रंगभूमी सादरीकरण करण्यात आले. याच्या जोडीला कलाकार होण्यासाठी रंगमंचीय खेळाचा वापर कसा करावा हे ही दाखवण्यात आलं. आपण प्रशिक्षणातून एक्टरशिप कशी करू शकतो, याचा एक आगळ्यावेगळ्या प्रक्रियेचा नाट्यअनुभव म्हणजे एक्टर व्हायचे तुला?? हे नाटक आहे.

ही दोन्ही नाटके वेगळा नवीन विषय म्हणून रंगभूमीवर प्रथमच आली आहेत. या निमित्ताने या दोन नाटकाचे प्रयोग गुरुस्कूल गुफान संस्थेच्यावतीने सादर झाले आहेत. त्याचे लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण प्राध्यापक देवदत्त पाठक यांनी केले आहे. तर, प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मिलिंद केळकर यांचा सहभाग आहे. गुरुस्कूल गुफान संस्थेची ही निर्मिती आजच्या काळात रंगभूमीकडे कशा दृष्टीने बघावे? त्याचबरोबर रंगभूमी कला कशासाठी? तर मनोरंजनाच्या बरोबर प्रबोधनापेक्षाही उद्बोधन या मूळ उद्देशाने प्रयोग निर्माण करण्यासाठी व्हावेत, असे प्रतिपादन या निमित्ताने देवदत्त पाठक यांनी केले आहे.

यामध्ये गौरी पत्की ,अक्षदा वागवसे, अर्णव देशपांडे, मल्हार बनसोडे, अक्षता जोगदनकर, धनश्री गवस, निर्मिती करपे, ऋतुजा केळकर, आर्या करपे ,अलोक जोगदनकर, अथर्व जाधव आणि देवदत्त पाठक यांनी अभिनय करत सहभाग घेतलेला आहे. गुरस्कूल गुफान संस्थेची ही या तीन महत्त्वाच्या दिवसांच्या निमित्ताने झालेली निर्मिती म्हणजे रंगभूमी कला कशासाठी? या ग्रीक रंगकर्मीं फिडोरस तरजोपोलस यांनी व्यक्त केलेली खंत आणि त्याचे उत्तर आहे. या नाटकांच्या सादरीकरणाच्या निमित्त देवदत्त पाठक आणि त्यांच्या गुरुस्कूल गुफान संस्थेच्या टीमने हे उत्तर शोधले आहे असे म्हणावे लागेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number