पल्लवी का करायची चोरी ?

मुंबई, ९मे २०२३, प्रतिनिधी : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलेसे वाटते. या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात ते काय करतात आणि कसे राहतात याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असते. ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील सर्वांची आवडती आनंदी अर्थात अभिनेत्री पल्लवी पाटील हिने अलीकडेच एका […]

पल्लवी का करायची चोरी ?

मुंबई, ९मे २०२३, प्रतिनिधी : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलेसे वाटते. या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात ते काय करतात आणि कसे राहतात याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता असते. ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील सर्वांची आवडती आनंदी अर्थात अभिनेत्री पल्लवी पाटील हिने अलीकडेच एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला आहे.

अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पल्लवीने आपल्या मालिकेच्या सेट वरील काही गमतीदार किस्से सांगितले.त्याचबरोबर तिने बालपणीच्या आठवणींना देखील उजाळा दिला. ती म्हणाली, “मला लहान असताना खूप वाईट सवय लागली होती. आमच्या घरी अक्षय्यतृतीयेला पैसे लावून पत्ते खेळतात. माझे काका वगैरे ते खेळायचे आणि ते मी बघायचे. तेव्हा मी ते पैसे डब्यातून चोरायचे. आमच्या घरी दुपारी जेवण झाले की सगळे तासभर झोपायचे. त्या दरम्यान मी माझ्या सर्व बहिणींना एकत्र गोळा करून पैसे चोरून घेऊन जायचे.असच एकदा माझ्या आईने मला पैसे चोरताना पाहिलं आणि मग मी खूप मार खाल्ला.” पल्लवीचा हा विडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number