‘वेगळा पक्ष का काढला नाही’?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाने परस्पर निर्णय दिला आहे. महाराष्ट्रात पश्चिम बंगाल सारखा निकाल लागेल. या निर्णयावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंवर […]

‘वेगळा पक्ष का काढला नाही’?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाने परस्पर निर्णय दिला आहे. महाराष्ट्रात पश्चिम बंगाल सारखा निकाल लागेल. या निर्णयावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडला आहे. ‘मर्द होता तर वेगळा पक्ष काढायचा होता’ अशी टीका त्यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले, दिल्लीतील महाशक्तीने आधीच एकनाथ शिंदेंना पक्षनाव व धनुष्यबाण देण्याचे वचन दिले होते. दिल्लीतच हे कटकारस्थान ठरले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाचा गळा दाबून शिंदे गटाला धनुष्यबाण व शिवसेना हे पक्षनाव देण्यात आले आहे.

एकनाथ शिंदेंना उद्देशून संजय राऊत म्हणाले, रावणाला धनुष्यबाण पेलवणार नाही. ते धनुष्यबाण रावणाच्या छाताडावर पडेल. शिंदे गटाचे आमदार हे आमिषाला बळी पडून बाहेर पडले आहेत. त्यामुळे शिवसेना हा पक्ष त्यांच्या मालकीचा कसा? निवडणूक आयोगाचा हा निर्णय सर्व कायदे पायदळी तुडवून दिला आहे. याविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला जाब विचारणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली आहे. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढची वाटचाल करू असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number