मुंबई, ९मे २०२३, प्रतिनिधी : भारताचे दिग्गज गायक , संगीतकार ए आऱ रहमान यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्यांच्या गाण्यांची प्रेक्षक नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांच्या आगामी गाण्याची एक वेगळीच उत्सुकता पसरली आहे. दरम्यान त्यांच्या एका वक्त्यव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
अलीकडेच रहमान यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामुळे ते चर्चेत आले आहेत. ए आऱ रहमान यांनी वॉल स्ट्रीट जर्नल यांचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये , शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजण्यासाठी ए आय प्रणालीचा उपयोग करून शाळेतील मुलांनी हातामध्ये आर्टिफिशयल इंटेलिजन्स हँडबँड परिधान केल्याचे दिसत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर रहमान यांनी ‘मला या पिढीची दया येते” असे म्हंटले ही पिढी एका ठराविक मर्यादेत राहणार असून ती शापित आहे असेही ते म्हणाले