मनोज जरांगे जनआक्रोश मोर्चातून का परतले?

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि सर्वत्र वातावरण तापलं. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

मनोज जरांगे जनआक्रोश मोर्चातून का परतले?

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि सर्वत्र वातावरण तापलं. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बीड, परभणी येथे मोर्चे झाले त्यानंतर पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित होते. या मोर्चासाठी मनोज जरांगे देखील उपस्थित होते, मात्र, मनोज जरांगे पाटील यांना मोर्चातून माघारी आपल्या गावी जावे लागले. त्याचं कारणही समोर आलं आहे.

नेमकं काय घडलं? 
मनोज जरांगे पाटलांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असल्याचं समजतंय. मनोज जरांगे पाटील यांच्या चुलत भावाचे अपघाती निधन झाले आहे. यामुळेच मनोज जरांगे पाटील पुण्यातून पुन्हा आपल्या गावी गेल्याच समोर आलं आहे. सुरेश धस यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

काय म्हणाले सुरेश धस? 
आता मनोज दादांच्या कुटुंबातील त्यांचा चुलत भावाचं निधन झालं असल्यामुळे ते इथे येऊन परत गेलेत.साडेपाच वाजता ते त्यांच्या मातोरी या गावावरून निघाले होते इथपर्यंत आले, परंतु दुर्दैवी घटना घडल्यामुळे ते परत गेले आणि पृथ्वीराज देशमुख यांचाही फोन इथे आल्यावर आला होता, की मोर्चाच्या शुभारंभ करून द्यायला मी होतो. मात्र, पुढे वेळ झाल्यामुळे पुढचं काम असल्यामुळे ते गेले अशी माहिती यावेळी बोलताना सुरेश धस यांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number