कोरोनाकाळात अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासली. मात्र कोरोना काळात महाविकासआघाडीकडन अनियमीततेची मालिका समोर आली आहे. औरंगाबादनंतर आता जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीच्या दणक्यामुळे कोल्हापूरमध्येही व्हेंटिलेटरचा घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. केंद्राकडून पाठवण्यात आलेले व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात वापरली जात आहेत. त्यामुळे केंद्राने दिलेले व्हेंटिरलेटर खासगी रुग्णालयात कशाला? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोल्हापूरमध्ये केंद्राने पाठवलेले व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात वापरण्यात येत आहेत. केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर वापरून खासगी रुग्णालय रुग्णांकडून भरमसाठ बिल आकारत आहेत. त्यामुळे कोरोनाकाळातील कोल्हापूरमधील व्हेंटिलेटरचा घोळ समोर आला असून केंद्राने दिलेले व्हेंटिलेटर खासगी रुग्णालयात का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने या बातमीची दखल घेत कोल्हापूर महानगरपालिकेने तातडीने बैठव बोलवली. घोटाळा उघड करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक बोलावली आहे.