‘हाऊसफुल 4’मधून नाना गुल, नानाऐवजी लागणार ‘या’ अभिनेत्याची वर्णी!

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाचे पडसाद नाना यांच्या चित्रपट कारकीर्दीवर पडू लागले आहेत. ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटातून अखेर नानांची गच्छंती झाली आहे. आता नाना पाटेकर करत असलेली भूमिका बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ अर्थात संजय दत्त साकारणार असल्याची चर्चा आहे. तसंच अनिल कपूरलाही या भूमिकेसंदर्भात विचारणा झाली आहे. नाना पाटेकरवर झालेल्या आरोपांनंतर […]

‘हाऊसफुल 4’मधून नाना गुल, नानाऐवजी लागणार ‘या’ अभिनेत्याची वर्णी!

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाचे पडसाद नाना यांच्या चित्रपट कारकीर्दीवर पडू लागले आहेत. ‘हाऊसफुल 4’ या चित्रपटातून अखेर नानांची गच्छंती झाली आहे. आता नाना पाटेकर करत असलेली भूमिका बॉलिवूडचा ‘मुन्नाभाई’ अर्थात संजय दत्त साकारणार असल्याची चर्चा आहे. तसंच अनिल कपूरलाही या भूमिकेसंदर्भात विचारणा झाली आहे.

नाना पाटेकरवर झालेल्या आरोपांनंतर #MeToo मोहिम मोठ्या प्रमाणावर छेडली गेली. यामध्ये हाऊसफुल 4 सिनेमाचा दिग्दर्शक साजिद खान याच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप झाले. या पार्श्वभूमीवर चित्रपटातील मुख्य कलाकार अक्षय कुमार याने लैंगिक अत्याचाराच्या आरोपींसोबत काम करण्यास नकार दिला. तसंच दिग्दर्शक साजिद खाननेही ‘हाऊसफुल 4’ चित्रपट सोडून दिला. त्याचबरोबर सिनेमात काम करणाऱ्या नाना पाटेकर यांनाही चित्रपटातून बाहेर पडावं लागलं.

लवकरच हाऊसफुल 4 चं शुटिंग सुरू होत आहे. साजिद खानऐवजी फरहाद सामजी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, पूजा हेगडे, कृती खरबंदा, कृती सेनन, शरद केळकर, चंकी पांडे, जॉनी लीव्हर आणि बोमन इरानी हे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मात्र नाना पाटेकर यांची भूमिका संजय दत्त करणार की अनिल कपूर हे अजून निश्चित झालेलं नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number