सलमान सोबत दिसणारी चिमुरडी कोण ?

मुंबई, १४ मे २०२३, प्रतीनिधी : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सलमान सध्या त्याच्या ‘दबंग टूर’साठी कोलकात्यात आहे. दरम्यान त्याचवेळी सलमान खानची बहीण अर्पिता खानचे कुटुंबही कोलकात्यात होते. त्यामुळे सलमानने त्यांची भेट घेतली. यावेळी सलमानचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.   View this post on Instagram   A […]

सलमान सोबत दिसणारी चिमुरडी कोण ?

मुंबई, १४ मे २०२३, प्रतीनिधी : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सलमान सध्या त्याच्या ‘दबंग टूर’साठी कोलकात्यात आहे. दरम्यान त्याचवेळी सलमान खानची बहीण अर्पिता खानचे कुटुंबही कोलकात्यात होते. त्यामुळे सलमानने त्यांची भेट घेतली. यावेळी सलमानचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

 
View this post on Instagram
  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमान खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ सामायिक केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याची भाची आयतसोबत वेळ घालवताना दिसत आहे. यात सलमान खान चालत असताना, आयत त्याच्या मामाची नक्कल करताना दिसत आहे. त्याचवेळी हे दृश्य पाहून सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा हसतोय. सलमान खानने या व्हिडिओला ‘Following the footsteps of Mamu…’ असे कॅप्शन दिले आहे, यासोबत दबंग लोडेड कोलकाता असे हॅशटॅगही दिले आहे. सलमान खान आणि आयतच्या या गोड व्हिडिओवर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही प्रतिक्रिया देत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number