मुंबई, ५ मे २०२३, प्रतिनिधी : अभिनेता सैफ अली खान याची मुलगी अर्थात बॉलीवूडची बबली गर्ल सारा अली खान ही आपल्या आणि अमृता सिंग यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते. सारा समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असते. तिचे अतरंगी व्हिडिओ तिच्या चात्यांना नेहेमीच खूप आवडतात. दरम्यान तिची एक पोस्ट सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री सारा अली खान सध्या बाहेर फिरण्यासाठी गेली आहे. दरम्यान आपल्या सुट्टीचे काही खास फोटो ती समाज माध्यमांवर सामायिक करत आहे. परंतू या सगळ्यात एका खास फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. नुकतेच साराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे पूलमधील काही फोटो सामायिक केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिची आई अमृता सिंग आणि मित्रांसोबत दिसत आहे. या सगळ्यात एका फोटोत मात्र ती स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे. यावेळी तिच्यासोबत एक व्यक्ती देखील या पूलमध्ये दिसत आहे. आता हा व्यक्ती नेमका कोण अश्या अनेक चर्चांना उधाण आले आहे.
फोटोत सारा पूलमध्ये त्या व्यक्तीशी बोलताना दिसत आहे. त्या व्यक्तीने चष्मा घातलेला दिसतोय तर हा व्यक्ती सारा चा जवळचा मित्र आहे असे म्हंटले जात आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत.