बॉलीवूडची बिनधास्त गर्ल म्हणजेच अभिनेत्री काजोल तिच्या बिनधास्त आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. ती नेहमीच सगळ्यांशी माध्यमांसमोर मोकळेपणाने व्यक्त होताना दिसते.मात्र त्यामुळे बऱ्याचदा तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. नुकतीच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दोन पोस्ट लिहिल्या आहेत. ह्या पोस्ट वाचल्यानंतर तिचे चाहते संभ्रमात पडले आहेत.
अभिनेत्री काजोलने नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा राग व्यक्त केलाय. मात्र हा राग कोणाविषयीचा आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. काजोलने आपल्या स्टोरीत २ पोस्ट शेअर केल्यात यातील पहिल्या पोस्टमध्ये लिहिलंय,‘जे लोक फक्त डोळ्यांनी प्रेम करतात, त्यांच्यासाठी ‘गुडबाय’ हा शब्द असतो. पण जे मनापासून प्रेम करतात त्यांच्यात अश्या काही गोष्टी नसतात.त्यांच्यासाठी ‘विभक्त’ नावाची कोणतीच गोष्ट नसते- रुमी’. तर दुसऱ्या पोस्ट मध्ये तिने लिहिलंय,’ #truthoftheday (आजच्या दिवसाचं सत्य) ‘स्री असो किंवा पुरुष.. दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भित्रेपणा असतो. (पुढे शिवीचाही वापर) त्यांची किंमत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या लिंगापुढे आंधळे होऊ नये हीच खरी युक्ती आहे.’ या पोस्टच्या अखेरीस तिने #thishithome असे हॅशटॅग वापरले आहे. ही पोस्ट पाहिल्यावर काजोलने आपल्या पोस्टने कोणावर निशाणा साधलाय,असा प्रश्न सध्या नेटकऱ्यांना पडला आहे.