Low Rainfall Impact on Economy : दुष्काळात तेरावा महिना! आखाती युद्धाचा फटका अन् कमी पावसाच्या अंदाजानेही दिली चिंता; महागाईचा दुहेरी हल्ला!

अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आधीच मोठा परिणाम झाला आहे. अशातच कमी मान्सूनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Low Rainfall Impact on Economy : दुष्काळात तेरावा महिना! आखाती युद्धाचा फटका अन् कमी पावसाच्या अंदाजानेही दिली चिंता; महागाईचा दुहेरी हल्ला!

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्यामुळे यंदा मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. एल निनोच्या अडथळ्यामुळे 'मे' मध्ये दाखल होणारा मान्सून वाटेतच रखडला आहे. त्यानुसार जूनमध्ये मान्सून हलक्या सरीत बरसणार असून जुलै ते ऑगस्टमध्ये एल निनोची स्थिती कमकुवत ते मध्यम असून यंदा 8 टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे केरळमध्ये सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वायव्य भारतातील बहुतेक कृषी आधारित भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा- Monsoon Update : 'मे' मध्ये दाखल होणारा मान्सून वाटेतच रखडला! एल निनोच्या अडथळ्यामुळे महाराष्ट्रावर मोठं संकट
अशातच कमी मान्सूनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आधीच मोठा परिणाम झाला आहे. खाद्यतेल, पेट्रोल-डिझेल आणि इंधनाच्या किंमतीत मोठी चढण सुरु झाली आहे. अशातच आगामी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल, म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेवरील आर्थिक दबाव आणि महागाई वाढण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार, महासागरात एल निनो सक्रिय झाल्यामुळे यंदा मान्सून 11 जूननंतर महाराष्ट्रात दाखल होणार आहे. यावेळी जूनमध्ये पडणारा पाऊस 92 टक्के म्हणजेच 8 टक्के कमी असू शकतो. कमी प्रमाणात पडणाऱ्या मान्सूनच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. शेतीक्षेत्रात परिणाम झाल्यामुळे त्याचे पडसाद सर्वसामान्यांच्या खिशावर देखील पडू शकतात. 

कमी मान्सूनचा परिणाम काय? 

  • ग्रामीण अर्थव्यवस्थेत वाढ तसेच अन्नधान्याच्या बिलात वाढ होण्याची शक्यता आहे. 
  • कमी पावसामुळे सिंचनासाठी इतर साधनांच्या वापरासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढेल. 
  • कमी पावसामुळे उत्पादनावर परिणाम होईल ज्यामुळे पिकांच्या किंमती वाढू शकतात.
  • पिकांच्या दरवाढीचा परिणाम अन्नधान्यावर होताना दिसून येऊ शकतो. 
  • त्याचा परिणाम एफएमसीजी क्षेत्रावरही दिसून येईल. यामध्ये टूथपेस्ट, साबण, खाद्यपदार्थ, आणि पॅकेज्ड वस्तूंचा समावेश होतो. 
  • यामुळे महागाईची वाढण्याची शक्यताही वर्तावण्यात येत आहे. 
  • यंदा IMD ने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवल्याने चिंता वाढली आहे. 
     

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number