विधानसभा निवडणुका तोंडावर ठेपली असून राजकीय पक्ष प्रचारासाठी सज्ज झाली आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्रात प्रचारासाठी आले होते. मात्र जिथे राहुल गांधी प्रचारासाठी जातात तिथे कॉंग्रेसचा पराभाव होणे निश्चित असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. हिंगोलीमधील भाजपा उमेदवार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचार सभेत टीका केली आहे. भाजपा सेना कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत असून राहुल गांधींमुळे युतीचा विजय होणे निश्चित असल्याची टीका केली आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जिथे प्रचार करणार तिथे कॉंग्रेसचा पराभव होणार अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
गेली १५ वर्ष महाराष्ट्रात कॉंग्रेसची सत्ता होती.
मात्र या काळात विकास झाला नाही फक्त भ्रष्टाचार झाला असल्याची टीका केली आहे.
भ्रष्टाचार करत नातेवाईकांचे आणि स्वत:चे घर भरले असल्याचा हल्लाबोल योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.