‘जे.पी.नड्डा जिथे, भाजपाचा पराभव तिथे’

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर, संजय राऊत यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. कर्नाटकातील निवडणुकांसाठी भाजपाचे सर्वच कार्यकर्ते गेले दिवस कंबर कसून प्रचार करत होते. परंतु, या निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसने बाजी मारली आणि भाजपाचा दारुण प्रभाव झाला. या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला. […]

‘जे.पी.नड्डा जिथे, भाजपाचा पराभव तिथे’

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तर, संजय राऊत यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

कर्नाटकातील निवडणुकांसाठी भाजपाचे सर्वच कार्यकर्ते गेले दिवस कंबर कसून प्रचार करत होते. परंतु, या निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसने बाजी मारली आणि भाजपाचा दारुण प्रभाव झाला. या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला. तर, उद्धव ठाकरे यांनी ‘हा मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव’ असल्याचे वक्तव्य केले होते.

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. त्यात आता ‘जेपी नड्डा महाराष्ट्रात येत असतील तर येऊ द्या. आनंद आहे. ते जिथे जिथे जातात तिथे त्यांचा पराभव होतो. ते कर्नाटकात ठाण मांडून बसले होते. तर, कर्नाटकात भाजपाचा पराभव झाला. आता ते महाराष्ट्रात येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करतो,’ असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number