बिग बॉस ओटीटी ३ कधी येणार भेटीला ?

बिग बॉस ओटीटी ३ कधी येणार भेटीला ?<br/>नवीन होस्ट अनिल कपूर यांनी तारीख सांगितली

बिग बॉस ओटीटी ३ कधी येणार भेटीला ?

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ‘बिग बॉस ओटीटी ३‘च्या रिलीज डेटसाठी प्रेक्षक आतुर होते. अखेर त्या प्रश्नाचे उत्तर चाहत्यांना मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी ३‘चा पहिला प्रोमो रिलीज झालेला होता. त्यामध्ये, होस्ट म्हणून बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर म्हणून दिसला होता. आता प्रेक्षकांसमोर ‘बिग बॉस ओटीटी ३’ या शोची स्ट्रीम डेट जाहीर करण्यात आलेली आहे. त्यासोबतच अनिल कपूरचा फर्स्ट प्रोमोही शेअर करण्यात आलेला आहे. 

काही तासांपूर्वीच जिओच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम पेजवर आणि अनिल कपूरच्या ऑफिशियल इन्स्टाग्रामवर ‘बिग बॉस ओटीटी ३’चा फर्स्ट लूक शेअर करण्यात आलेला आहे. “प्रेझेंटिंग अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी ३’ शोचा नवीन होस्ट! अनेक चित्रपट गाजवल्यानंतर आता अनिल कपूर बिग बॉस हाऊसमध्ये सत्ता गाजवणार आहे. एक्स्ट्रा कुछ खास! २१ जूनपासून अनिल कपूरची खास जादू बघायला मिळणार आहे.” असं कॅप्शन अभिनेत्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करताना दिली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number