Ashok Kharat Case Update : मुलानेच आणलं खरातला गोत्यात! SIT च्या चौकशीदरम्यान अत्यंत महत्त्वाचा खुलासा करत म्हणाला, "घरात खूप…"

भोंदू अशोक खराब प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा खुलासा झाला आहे. SIT ने खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती.

Ashok Kharat Case Update : मुलानेच आणलं खरातला गोत्यात! SIT च्या चौकशीदरम्यान अत्यंत महत्त्वाचा खुलासा करत म्हणाला, &quotघरात खूप…&quot

स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. SIT तपासादरम्यान पोलिसांसमोर रोज काही ना काही धक्कादायक खुलासे होत आहेत. नाशिकचा स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात खरातसोबतच अनेक नेते आणि बडे अधिकारी हे देखील गोत्यात आल्याचे पाहायला मिळाले. अशातच खरातसह त्याची पत्नी देखील पोलिसांच्या रडारवर आली आहे. कल्पना खरात फरार झाल्यामुळे त्यांचा मुलगा हर्षवर्धन हा पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यानंतर हर्षवर्धनची SIT पथकाकडून चौकशी करण्यात आली.

यादरम्यान भोंदू अशोक खराब प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा खुलासा झाला आहे. SIT ने खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली होती. त्या चौकशीदरम्यान खरातच्या मुलाने मोठी कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. SIT कडून खरातच्या मुलावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली तेव्हा त्याने ‘सर्व डॅडला माहिती, मात्र घरात खूप कॅश यायची”,अशी उत्तर देत कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान खरात प्रकरणातून त्याच्या स्वतःच्या मुलाने देखील काढता पाय केल्याचे त्याच्या उत्तरावरून समजते आहे. 

हेही वाचा- Sunetra Pawar Meet Praful Patel-Sunil Tatkare: राष्ट्रवादीत धुसफूस? सुनेत्रा पवारांनी घेतली पटेल-तटकरेंची नवी दिल्लीत भेट

तसेच भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. फरार पत्नी कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेरच्यांशी संपर्कात नसून ती 16 वर्ष माहेरी गेली नसल्याची माहिती समोरी आली आहे. एवढच नव्हे तर वडील व भावाच्या निधनावेळीही कल्पना माहेरी गेली नाही. कुटुंबीयांशी संपर्क पूर्णपणे तुटलेल्यानंतर कल्पना खरातच्या माहेरची आर्थिकदृष्ट्या हलाखीची परिस्थिती सुरु असून कुटुंबीय शेतीवर उदरनिर्वाह करत होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने कल्पनाच्या माहेरची माहिती उघड झाली असून खरात प्रकणासंबंधी आम्हाला प्रकरणाशी देणं-घेणं नसल्याचा नातेवाईकांचा दावा आहे. सध्या कल्पना खरात फरार असून सिन्नर तालुक्यातील पाडळी येथे एसआयटीकडून आणखी चौकशी सुरु आहे. सध्या अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून पुढील सुनावणीत काय होते हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number