मुंबई, २९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी :‘रिषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ या चित्रपटाने संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला. मूळ कन्नड भाषेतील या चित्रपटाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर निर्मात्यानी त्याचं इतर भाषांमध्ये चित्रिकरण करण्यात आले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. ‘कांतारा’ हा कन्नड चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात गाजलेला चित्रपट ठरला आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
दरम्यान, रिषभ शेट्टीने इंस्टाग्राम या समाज माध्यमांवर एक व्हिडीओ सामायिक केला आहे. या व्हिडिओमध्ये रिषभ शेट्टी खऱ्या पंजुरली देवासोबत दिसत आहेत. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर बराच चर्चेत ठरतोय. चाहत्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. ‘कांतारा’ चित्रपटाच्या कथेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. त्यामुळे कांतारा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा चाहते करत आहेत.
कांतारा’ सिनेमाच्या पहिल्या भागानंतर चाहते ‘कांतारा 2’ साठी उत्सुक आहेत. ‘कांतारा 2’ सिनेमाबद्दल ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मोठी माहिती दिली. तसेच, दिग्दर्शक रिषभ शेट्टीने महत्त्वाची घोषणा केली आहे. ‘२०२४ मध्ये कांतारा 2’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो. २०२२मध्ये सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीमध्ये ‘कांतारा’ सिनेमाचं नाव आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने मोठी मजल मारली असून ‘कांतारा’ सिनेमाने जवळपास ४०० कोटी रुपयांची कमाई केली.