व्हॉट्सअॅपवरुन QR कोड स्कॅन करून सहजरीत्या पैसे पाठवणे शक्य

वृत्तसंस्था, नवी दिल्ली सोशल नेटवर्किंगमध्ये व्हॉट्सअॅप जास्त प्रमाणात वापरले जाते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ सहजरित्या शेअर करता येतात. आता व्हॉट्सअॅपने नवं फिचर आणलं आहे. त्या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवणे आणखी सोपे झाले आहे. व्हॉट्सअॅपनं लाँच करण्यात आलेल्या यूपीआय पेमेट् अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे शक्य झाले. मात्र पैसे ट्रान्सफर करताना युजर्सचा त्रास कमी करण्यासाठी व्हॉट्सअॅपनं […]

व्हॉट्सअॅपवरुन QR कोड स्कॅन करून सहजरीत्या पैसे पाठवणे शक्य

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सोशल नेटवर्किंगमध्ये व्हॉट्सअॅप जास्त प्रमाणात वापरले जाते. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ सहजरित्या शेअर करता येतात. आता व्हॉट्सअॅपने नवं फिचर आणलं आहे. त्या फिचरमुळे व्हॉट्सअॅपवरून पैसे पाठवणे आणखी सोपे झाले आहे.

व्हॉट्सअॅपनं लाँच करण्यात आलेल्या यूपीआय पेमेट् अॅपच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे शक्य झाले. मात्र पैसे ट्रान्सफर करताना युजर्सचा त्रास कमी करण्यासाठी व्हॉट्सअॅपनं नवं फिचर आणलं आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पैसे पाठवणे आणखी सोपं होणार आहे.

व्हॉट्सअॅपवरून पैसे ट्रान्सफर करताना युजर्सना रक्कमेचा आकडा टाकल्यावर यूपीआय पीन टाकावा लागतो. आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया करावी लागते. आताच्या नव्या व्हॉट्सअॅप फिचरमुळे यापैकी काहीचं करावं लागणार नाही. क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवणे शक्य झाले आहे. व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्समध्ये ‘Payments’ च्या ऑप्शनवर क्लिक करून त्या यादीत दिसणाऱ्या ‘New Payment’ ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर ‘Scan QR code’ या ऑप्शनवर टॅप केल्यानंतर मोबाईल स्क्रिनवर कोड स्कॅनर दिसेल. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील, त्याच्या मोबाइल स्क्रिनवर दिसणारा कोड स्कॅन करून अगदी सहज पैसे ट्रान्सफर करू शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number