Whatsapp New Feature: कुत्र्याचं भुंकणं असो वा भाकरीचा थापपट; व्हॉट्सॲप आता सगळा गोंधळ निस्तरणार! कॉलिंगसाठी येतंय ‘हे’ खास फीचर

लवकरच स्मार्टफोनवर बोलताना येणाऱ्या एका मोठ्या त्रासातून वापरकर्त्यांची सुटका होणार आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांसाठी उपलब्ध असेल.

Whatsapp New Feature: कुत्र्याचं भुंकणं असो वा भाकरीचा थापपट; व्हॉट्सॲप आता सगळा गोंधळ निस्तरणार! कॉलिंगसाठी येतंय ‘हे’ खास फीचर

लवकरच स्मार्टफोनवर बोलताना येणाऱ्या एका मोठ्या त्रासातून वापरकर्त्यांची सुटका होणार आहे. अनेकदा फोनवर बोलताना आजूबाजूचा गोंगाट इतका वाढतो की समोरच्या व्यक्तीपर्यंत आवाज स्पष्ट पोहोचत नाही. गर्दी, वाहतूक किंवा वाऱ्याचा आवाज यामुळे संभाषण अडथळ्यांत येते. आता मात्र लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप एक असे नवे फीचर आणण्याच्या तयारीत आहे, जे कॉलदरम्यानचा हा त्रास जवळपास संपवू शकते.

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप कंपनी सध्या व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी ‘नॉइस कॅन्सलेशन’ फीचरची चाचणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी अपडेटमध्ये हे फीचर वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फीचरमुळे कॉल दरम्यान पार्श्वभूमीतील आवाज कमी होऊन संवाद अधिक स्पष्टपणे ऐकू येईल.

हेही वाचा: Fruit For Good Health: हृदयविकारापासून दूर राहायचे असेल, तर या फळाचे सेवन ठरेल गुणकारी; आहारतज्ज्ञांनी सांगितले अनेक फायदे

दैनंदिन जीवनात अनेकदा गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान फोनवर बोलावे लागते. अशा वेळी वाहनांचे हॉर्न, लोकांची गर्दी किंवा इतर आवाजांमुळे कॉलवर समोरच्या व्यक्तीला आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. व्हॉट्सअ‍ॅपचे हे नवे फीचर अशा समस्येवर उपाय ठरणार आहे. हे फीचर वापरकर्त्याच्या आजूबाजूचा आवाज ओळखून तो फिल्टर करेल आणि समोरच्या व्यक्तीपर्यंत केवळ स्पष्ट आवाज पोहोचवेल.

मीडिया अहवालांनुसार हे फीचर अँड्रॉइड आणि अ‍ॅपल या दोन्ही प्रकारच्या उपकरणांवर कार्य करणार आहे. आयफोन आणि आयपॅडमध्ये आधीपासूनच ‘व्हॉइस आयसोलेशन’सारखे फीचर उपलब्ध आहे, जे कॉल दरम्यान पार्श्वभूमीतील आवाज कमी करण्यास मदत करते. व्हॉट्सअ‍ॅप या प्रणालीचा वापर ऑडिओ सेटिंगद्वारे करू शकते. मात्र अँड्रॉइड उपकरणांमध्ये असे फीचर नसल्याने व्हॉट्सअ‍ॅपचे नवे नॉइस कॅन्सलेशन फीचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी विशेष उपयुक्त ठरू शकते.

या फीचरचे नियंत्रण पूर्णपणे वापरकर्त्याच्या हातात असेल. म्हणजेच वापरकर्त्याला नॉइस कॅन्सलेशन वापरायचे की नाही, हे स्वतः ठरवता येईल. गरज नसल्यास ते बंद करण्याचाही पर्याय उपलब्ध असेल. तसेच या फीचरमुळे व्हॉट्सअ‍ॅपच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरक्षेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा: Hockey World Cup 2026 Schedule: हॉकी विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान 'या' दिवशी भिडणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number