जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत वादळ येणार असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत आहेत. मात्र, अशा कोणत्याही वादळाचा धोका नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुंबई महापालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी केले आहे.
मुंबईत दुपारनंतर फियान वादळ धडकणार असल्याचे मेसेज व्हॉट्सअपवर फिरत आहेत. मात्र हवामान विभागाकडून असा कोणताही इशारा दिला नाही असं सुधीर नाईक यांनी सांगितले.
वादळामुळे वांद्रे-वरळी सीलिंक, पेडर रोड बंद करण्यात आला. सायन ब्रिज बंद झाला असून, वाहने माघारी पाठवत असल्याचे मेसेजही फॉरवर्ड होत आहेत. मात्र अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन महापालिकेने केले.