वृत्तसंस्था, नवी दिल्ली
सर्वाधिक वापरण्यात येणारे व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन अपडेट घेवून येत आहे. या अपडेटनंतर सहजरीत्या व्हॉट्सअॅपवर व्हाईस रेकॉर्ड करता येईल.
एका अहवालानुसार व्हॉट्सअॅप अपडेट मध्ये लॉक्ड रिकॉर्डिंग (Locked Recording) हे फिचर येत आहे. या फिचरच्या मदतीने युजर्सना व्हॉईस रेकॉर्ड करता येईल. सध्य स्थितीत युजरला व्हॉईस मेसेज पाठवताना रेकॉर्डचे बटन होल्ड करुन ठेवावे लागते, मात्र आता या नव्या अपडेटमध्ये पूर्ण रेकॉर्डींग होईपर्यंत बटन होल्ड करण्याची गरज लागणार नाही. फक्त एकदाच बटण प्रेस करुन रेकॉर्डींग सुरु करता येईल. रेकॉर्डींग संपल्यावर रेकॉर्ड आयकॉनवर क्लिक केल्यास सहजरित्या व्हाईस रेकॉर्ड होईल.
अहवालानुसार हे नवे फिचर सध्या अॅनरॉईडच्या बीट व्हर्जनवर 2.18.70 आणि 2.18.71 वर सध्या याची तपासणी सुरु आहे. तसंच या नव्या अपडेटमुळे व्हॉईस रेकॉर्डचा प्रिव्यू ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे त्यात चुका आढळल्यास, लगेच निर्दशनास येतील.