महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी सुरु आहेत. त्यातच आता दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांच्या जखमेची खपली काढली आहे. ‘जनतेने पवारांना आजवर बहुमत कधीच दिलं नाही. इतरांना जे जमले नाही ते पवारांना नाही जमले’ असं वक्तव्य वळसेंनी केले आहे.
पवारांचे नेमके दुखणे काय ?
आजच्या घडीला शरद पवार देशातले वयोवृद्ध आणि अनुभवी राजकारणी आहेत. पवार काँग्रेसचे सरकार पाडून स्वतः मुख्यमंत्री झाले. आतापर्यंत शरद पवारांनी काँग्रेस तीनदा सोडली तर, एकदा फोडली आहे. देशभरात पवारांचा जनसंपर्क दांडगा आहे. इतकं असूनही पवारांना महाराष्ट्राने कधीही बहुमत दिलं नाही. पवार पंतप्रधान होतील या अपेक्षेने जनतेने काँग्रेसचे सर्वाधिक खासदार निवडून दिले. मात्र, शंकरराव चव्हाण यांनी पवारांच्या वाटेत काटे पेरले. राष्ट्रवादी स्थापन झाल्यावर पवारांना सर्वाधिक आमदार संख्या मिळाली. मात्र बहुमत पवारांपासून कायम दूरच राहिले. या तुलनेत मायावती, ममता, केजरीवाल अनेकदा बहुमतात सरकारे बनवू शकले.