Google Pay Pocket Money : जगभरात यूपीआयचा वापर वाढला आहे. यूपीआयद्वारे पेमेंट करणे खूप कॉमन झाले आहे. त्यातच आता गूगल पेने एक नवं फीचर आणलंय.'गूगल पे'ने 'पॉकेट मनी' हे एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे 'UPI Circle' या सुविधेचा भाग आहे. या फिचरमुळे आता बँक खात्याशिवाय सुद्धा तुम्ही सुरक्षितपणे पेमेंट करु शकता. हे फिचर कसे काम करते?
गूगल पे (GPay) चे 'पॉकेट मनी' (UPI Circle) हे एक सुरक्षित आणि अधिकृत फिचर आहे. यात कुटुंबातील सदस्यांना बँक खात्याशिवाय डिजिटल पेमेंट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तुम्ही पैसे खर्च करण्यासाठी दोन प्रकारचे अधिकार देऊ शकता ज्यांच्याकडे स्वतःचे बँक खाते किंवा स्वतंत्र UPI आयडी नाही, अशा व्यक्तींना तुम्ही Secondary User म्हणून निवडून तुमच्या खात्यातून पैसे खर्च करण्याची परवानगी देऊ शकता. पण याचं नियंत्रण तुमच्या हातात असेल. पैसे तुमच्या बँक खात्यातून कापले जातील, परंतु त्याचा खर्च किती व्हावा आणि कुठे व्हावा याचे पूर्ण नियंत्रण तुमच्याकडे म्हणजेच Primary User कडे असेल.
सध्या गूगल पेच्या याच पॉकेट मनीबाबत सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. 'गूगल पेच्या या फिचरवर क्लिक केल्यास तुमच्या बॅंक खात्यातील पैसे खाली होतील' मात्र ही निव्वळ अफवा असल्याचं गूगल पे कडून स्पष्ट करण्यात आलंय.
पाहा व्हिडीओ – Google Pay Pocket Money
पॉकेट मनी फिचर नेमकं कसं वापरावं?
गूगल पे ॲपमधील Profile सेक्शनमध्ये जाऊन UPI Circle निवडा.
ज्याला पैसे द्यायचे आहेत त्याचे नाव किंवा नंबर निवडा किंवा त्यांचा UPI Circle QR कोड स्कॅन करा.
मंजुरीची पद्धत निवडा (मासिक मर्यादा किंवा प्रत्येक वेळी मंजुरी).
त्या व्यक्तीशी असलेले नाते आणि त्यांचा सरकारी आयडी नंबर भरा.
तुमचा UPI PIN टाकून तुम्ही हा व्यवहार करू शकता.