काही लोक व्यायामाचं टाइमटेबल बनवतात. पण या वेळापत्रकानुसार व्यायम करण्याचा मात्र बहुतेकवेळा कंटाळा केला जातो. त्यामुळे अपेक्षित परिणाम तर दिसून येत नाहीच. उलट त्याचे गंभीर परिणाम होण्याचीच भीती वाढते.
अभ्यासातून असं दिसून आलंय की, व्यायामाची इच्छा असली, तरी इच्छाशक्तीचा मात्र आभाव असतो. त्यामुळेच वेळेच योग्य पालन करून व्यायाम केला जात नाही. मात्र जेव्हा व्यायाम करायला सुरुवात होते, तेव्हा मात्र आपोआप त्यामागे मांसपेशींची कार्यक्षमता वाढू लागते आणि व्यायामाची आवड निर्माण होते.
व्यायाम केल्याने आपलं आरोग्य सुधारण्यास निश्चित मदत होते. मात्र त्याची सुरुवात करण्यासाठी लागणारी प्रेरणा सहजरीत्या मिळत नाही. त्यामुळेच वेळापत्रक जरी असले, तरी शिस्त ही महत्त्वाची असते. शिस्तबद्धरीत्या व्यायाम सुरू केला, की शरीराला आपोआप व्यायामाची गोडी निर्माण होते, आणि शरीरच व्यायामासाठी अनुकूल होऊ लागतं. त्यामुळे आळस कमी होऊन शरीर स्वतःहून वेळापत्रकानुसार व्यायामासाठी प्रेरीत करू लागतं.