अजित पवार हे स्वतःला शरद पवारांचे वारस समजतात. पण, आधीपासूनच सुप्रिया यांना राजकारणात स्थापित करण्याकडे पवारांचा कटाक्ष होता. तसेच राजकीय वारस म्हणून शरद पवारांच्या मनात सुप्रियाच असल्याचे समोर येत आहे. आणि अनेक विश्लेषकांकडून आलेल्या प्रतिक्रियांवरून एकंदरीतच अध्यक्षपदाची अध्यक्षपदाची नवी जबाबदारी सुप्रिया सुळे यांना मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, जर सुप्रिया सुळे अध्यक्ष झाल्या तर शरद पवारांचा राजकीय वारसासुद्धा सुप्रिया यांच्याकडेच जाईल. यामुळे अजित पवार सुप्रियांच्या हाताखाली काम करतात असं चित्र देशापुढे उभे राहील. जर असे घडले तर अजित पवार यांच्या प्रतिमेला तडा जाण्याची भीती दादा गटाला वाटत आहे. तसेच ‘जसे पेराल तसे उगवेल’ या म्हणीप्रमाणेच अजित पवारांनी आजवर ज्यांचा पाणउतारा केला त्यांना संधी मिळण्याची भीतीदेखील त्यांना वाटत आहे. सुप्रिया या जर अध्यक्षपदाच्या मानकरी ठरल्या तर ताई गटाकडून दादा गटाचे खच्चीकरण होण्याची दाट शक्यता आणि भीती अजित पवारांना वाटते.