पवारांच्या भूमिका बदलण्यावर काय म्हणाले पडळकर?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर सर्वत्र नाराजी व्यक्त होताना दिसत होती. परंतु, शुक्रवारी पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी निर्णय मागे घेतला असून गोपीचंद पडळकर यांनी त्यावर खोचक वक्तव्य केलं आहे. शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर सर्वानीच ‘साहेब निर्णय मागे घ्या’ स गदारोळ माजवला होता. सर्वांच्या इतक्या विनंतीनंतर शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घेतला असून त्यावर […]

पवारांच्या भूमिका बदलण्यावर काय म्हणाले पडळकर?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर सर्वत्र नाराजी व्यक्त होताना दिसत होती. परंतु, शुक्रवारी पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी निर्णय मागे घेतला असून गोपीचंद पडळकर यांनी त्यावर खोचक वक्तव्य केलं आहे.

शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयावर सर्वानीच ‘साहेब निर्णय मागे घ्या’ स गदारोळ माजवला होता. सर्वांच्या इतक्या विनंतीनंतर शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घेतला असून त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान पवारांच्या राजीनाम्यामुळे सर्वत्र तीव्र भावना उमटली असल्याचे म्हणत पवारांनी निर्णयात बदल केला. परंतु, त्यांच्या या निर्णयाने अनेकजण खुश होऊन जल्लोष करीत असले तरी दुसरीकडे त्यांच्यावर खोचक वक्तव्य केली जात आहेत.

काय म्हणाले गोपीचंद पडाळकर?
‘स्वप्न पंतप्रधान बनण्याचे पण धडपड मात्र आपल्याच पक्षात आपलं महत्व चाचपडण्याची…
धन्य हा महाराष्ट्राचा महानटसम्राट!’
पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर गोपीचंद पडाळकरांनी हे ट्विट केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number