‘राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय येतच काय?’

बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत गेले बरेच दिवस चांगलाच वाद चिघळलेला पाहायला मिळत आहे. याच पार्श्ववभूमीवर शनिवारी राज ठाकरे यांनी रत्नागिरीत सभा घेतली. यामध्ये त्यांनी केलेल्या मिमिक्रीवर अजित पवार यांनी राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय येतच काय? अशी मिश्किल टीका केली आहे. शनिवारी बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत रत्नागिरीत घेतलेल्या सभेत बोलत असताना राज ठाकरे यांनी अनेकांवर टीका केली. तसेच, शरद […]

‘राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय येतच काय?’

बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत गेले बरेच दिवस चांगलाच वाद चिघळलेला पाहायला मिळत आहे. याच पार्श्ववभूमीवर शनिवारी राज ठाकरे यांनी रत्नागिरीत सभा घेतली. यामध्ये त्यांनी केलेल्या मिमिक्रीवर अजित पवार यांनी राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय येतच काय? अशी मिश्किल टीका केली आहे.

शनिवारी बारसू रिफायनरी प्रकल्पाबाबत रत्नागिरीत घेतलेल्या सभेत बोलत असताना राज ठाकरे यांनी अनेकांवर टीका केली. तसेच, शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता. अजित पवार यांच्या वागण्यामुळे शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. शरद पवारांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अजित पवारांना जणू उकळ्या फुटत होत्या, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. तसेच, सातत्याने कोकणाचे शोषण करणारे निवडून येतायत असे म्हणत कोकणवासियांचे राज यांनी कान उपटले.

अनेकांवर टोलेबाजी करत राज यांनी अजित पवारांची मिमिक्रीदेखील केली. त्यामुळे, राज ठाकरे यांच्या मिमिक्रीला प्रत्युत्तर देत अजित पवारांनी चांगलीच टोलेबाजी केली. माध्यमांसोबत बोलत असताना अजित पवार यांनी राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय येतच काय? असा प्रश्न करत खोचक टीका केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number